भरत जाधव संतापले ; लाज कशी वाटत नाही ?
दै. बातमीदार । १८ मे २०२३ । जगभरात तब्बल दोन वर्ष कोरोनाचे सावट होते त्यानंतर देशातील मराठी नाटकांना प्रेक्षकवर्ग आहे. त्यानंतर नाट्यगृहांकडे गर्दी वाढली. मराठी चित्रपट आवडीनं प्रेक्षक पाहायला जात आहे. यासगळ्यात प्रेक्षक अधिक सजग झाला आहे. त्याला ज्या गोष्टी खटकतात त्याविषयी तो सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागला आहे. मात्र नाट्यगृहांची दुरावस्था आणि त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या भरत जाधवनं परखडपणे मांडलेली भूमिका आता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. भरत जाधव यांनी एका मुलाखतीतून नाट्यगृहं, त्यांची दुरावस्था आणि त्यात सरकारची भूमिका याविषयी सडेतोडपणे भाष्य केले आहे. याशिवाय त्यानं मराठी चित्रपटांना स्क्रिन्स का मिळत नाही यावरही प्रतिक्रिया दिली आहे.
अजुनही सही रे सही, तू तू मी मी सारखी नाटकं प्रेक्षकांना आवडत आहे. दशकभरापूर्वीच्या नाटकांना प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद मिळतो आहे. त्यावर भरत जाधवनं सध्याची नाटकं, त्याचे लेखन, त्याची संहिता यावरही भाष्य केले आहे. नजीकच्या काळात नवोदित नाट्यलेखकांना अधिक दर्जेदार लेखन करावे लागणार आहे. आपण काय कंटेट देतो हेही महत्वाचे आहे. असे भरतनं त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. नाट्यगृहांची होणारी दुरावस्था आणि सोशल मीडियावर याबाबत होणारी चर्चा आम्हा कलाकारांपर्यत पोहचते. मात्र प्रत्येकवेळी कलाकारांनी काय करायचे यात प्रेक्षकांची भूमिका देखील महत्वाची आहे असे भरत जाधवनं म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रश्न प्रलंबित आहेत पण त्यावर कुणीच काही करत नाही. याविषयी कुणालाच काही वाटत नाही. अशीही खंत अभिनेत्यानं यावेळी व्यक्त केली आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम