भारत जोडो यात्रा दोन दिवस स्थगित ; राहुल गांधी निघाले कुठे?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ नोव्हेबर २०२२ देशात सुरु असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रेचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा खरं तर पायी आहे. महाराष्ट्रात मागील 15 दिवसांपासून पदयात्रेद्वारे फिरणारे राहुल गांधी आज अचानक हेलिकॉप्टरमध्ये बसलेले दिसून आले. गुजरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी गुजरातमध्ये दोन सभा घेण्यासाठी जाणार आहेत. यासाठी भारत जोडो यात्रा दोन दिवसांकरिता स्थगित करण्यात आली आहे.

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर निमखेडी फाटा येथे दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेली आहे. या ठिकाणाहून राहुल गांधी हेलिकॉप्टरने औरंगाबाद आणि त्यानंतर चार्टर्ड विमानाने ते गुजरात निवडणूक दौऱ्यावर जात आहेत.

राहुल गांधींचा आजचा दौरा कसा?
भारत जोडो यात्रेचा चमू निमखडी फाटा येथेच मुक्कामी असेल. राहुल गांधी मात्र हेलिकॉप्टरने सुरुवातीला औरंगाबाद व तेथून विमानाने सुरत व राजकोट येथील निवडणूक प्रचार सभेला संबोधित करून परत औरंगाबाद येथे येणार आहेत.

औरंगाबादमधून राहुल गांधी दुपारी एका चार्टर्ड विमानाने गुजरातच्या दिशेने रवाना होतील. तेथे अनावल, सूरत तसेच राजकोट येथे राहुल गांधींच्या दोन सभा होणार आहेत. संध्याकाळी ते पुन्हा औरंगाबाद विमानतळावर दाखल होतील. औरंगाबादमध्ये रात्री हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे ते मुक्कामी असतील. मंगळवारी सकाळी 7 वाजता ते भारत जोडो यात्रेसाठी निघतील. निमखेडी येथील ताफ्याला घेऊन ते मध्य प्रदेशच्या दिशेने जातील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम