भारत जोडो यात्रेचा आज होणार समारोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जानेवारी २०२३ । देशातील कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून सुरु झाली होती. त्याच भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. हजारो लोक खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेत चालत होते. ही यात्रा आज श्रीनगर आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही यात्रा सुरू करण्याचे कारण राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.

राहुल गांधी सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. राहुल यांच्या भारत जोडो यात्रेची मोठी चर्चा होती. आज भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोहासाठी देशातील काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांनी काल श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या.

गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेली भारत जोडो यात्र १२ राज्य आणि दोन केंद्रशासित परदेशातून गेली आहे. या यात्रेचा समारोप कार्यक्रम आज पार पडणार आहे. यासाठी देशातील २१ विरोधी पक्षातील नेते एकत्र येणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ध्वज फडकवतील त्यांनतर 11.30 वाजता सभेला सुरुवात होणार त्यामुळे या सांगता सभेत राहुल गांधी काय बोलतात या कडे देशाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम