समाजात छत्रपती शासन काळाची गरज – शिवव्याख्याते प्रेमचंद अहिराव
पारोळा…
समाजात महिलांवर होणारे अत्याचार पाहता सद्याचे कायदे कुचकामी ठरत आहे कि काय जनतेला पडत आहे म्हणून छत्रपती महाराजांचा तत्कालीन कार्यरत असलेला छत्रपती शासन अमलात आणण्याची गरज आहे अशी शिव भक्तांची गारज झाली आहे. असे शिवव्याख्याते प्रेमचंद अहिराव हे कार्यक्रम दरम्यान बोलत होते.
तालुक्यातील तामसवाडी येथील ना.शि.मंडळाचे हायस्कूल येथे कै.आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच करुणा ग्रंथलयाचे उदघाट्न देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच हिरामण पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री डॉ. सतीशराव पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ.सतीश पाटील यांनी कै.आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला, त्यांनी बोरी धरणासह अनेक प्रकल्प आणून तालुका सुजलाम, सुफलाम केल्याचे सांगितले. तसेच माणसाने केलेल्या कामाचा ठसा कुणाकडूनही पुसता येत नसल्याचे देखील स्पष्ट केले.
या कार्यक्रमास प्राचार्य ए. के. चव्हाण, पर्यवेक्षक डी. आर. पाटील, वि का सोसायटी चेअरमन राजधर पवार, व सर्व संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. डी. पाटील यांनी तर आभार संदीप पवार यांनी मानले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम