भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ नोव्हेबर २०२२ भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज शुक्रवार त्यांचा जामीन मंजूर केला. तेलतुंबडे यांना 2020 पासून तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. भीमा – कोरेगाव प्रकरणातील संशयित आनंद तेलतुंबडेंना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनआयएच्या सुप्रीम कोर्टात अपील करण्याच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने आदेशाला एका आठवडयाची स्थगिती दिली आहे.

अर्बन नक्षलवाद प्रकरणी आयआयटीचे प्राध्यापक व दलित विचारवंत आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तेलतुंबडे यांचे बंदी घातलेल्या ‘सीपीआय’ (माओवादी) या संघटनेशी संबंध असलेल्या आरोप एनआयएने आरोपपत्रात केला होता. प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव-एल्गार परिषदेत त्यांचा सक्रीय सहभाग होता असा आरोप ही त्यांच्यावर होता. या प्रकरणी 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

आनंद तेलतुंबडे यांना जामीन मिळाला असले तरी पुढील 7 दिवस त्यांची कारागृहातून सुटका होऊ शकणार नाही. कारण ‘एनआयए’ने सुप्रीम कोर्टात अपील करण्यासाठी वेळ मागत विनंती केली आहे. हायकोर्टाने ही विनंती मंजूर केल्याने पुढील 7 दिवस आनंद तेलतुंबडे यांना कारागृहातच रहावे लागणार आहे. माझ्याविरोधात काहीच पुरावे नसून जातीसयवादी शक्तीकडून मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, असे जामीनासाठी केलेल्या अर्जात तेलतुंबडे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम