जिल्ह्यात वन विभागाची मोठी कारवाई ; लाकडासह दोन ताब्यात !
बातमीदार | १६ ऑगस्ट २०२३ | यावल पश्चिम व पुर्व वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे १२ लाख रूपये किमतीच्या वाहतुक मोटरसह सुमारे ३० हजार रूपये किमतीचे लाकुड जप्त केलेले आहे.
वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार दि. १४ ऑगस्ट सोमवार रोजी रात्री ४ ते ६ वाजेच्या दरम्यान उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांचे कडून मिळालेल्या गुप्त माहिती वरून यावल ते किनगाव रस्त्याने गस्त करीत असलेल्या वन विभागाच्या पथकास चुंचाळे गावा जवळ संशयितरित्या जात असलेल्या वाहन क्रमांक.एमएच २८ बी ८५४३ याचा अटकाव करून वाहनाची तपासणी केली असता अवैधरित्या विनापरवाना (बिनापासी ) लाकूड तसेच यावल ते हरिपुरा रस्त्याने गस्त करित असताना वाहन क्रमांक एच आर-४७बी ०६७२ वाहनात अवैध लाकूड भरलेले आढळुन आले, गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने चौकशी केले असता सदरच्या वाहन चालका कडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. प्रथथदर्शनी वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे आणून ताबा पावतीने जमा केले.
१ ) इमारती लाकूड अंदाजे १३:००० घन मिटर १६१०० किंमत रुपये व जप्त वाहन क्रमांक एमएच २८- बी ८५४३मालवाहतुक ट्रक किंमत अंदाजे सात लाख रुपये आहे. प्रकरणी व. र.निंबादेवी यांनी प्र. रि. क्र. ११ / २०२३ दिनांक ११ ऑगस्ट २०२३ जारी केला वाहन चालक जियाफत अली नजाफत अली रा. सुरत गुजरात पंचरस जळावू लाकूड अंदाजे ४:०० घन मिटर सुमारे ४५०० किंमत रुपये व जप्त वाहन क्रमांक एच आर ४७ बी. ०६७२ मालवाहतुक ट्रक किंमत पाच लाख रुपये ईतकी असुन, या प्रकरणी व. र. हरिपूरा यांनी प्र री. क्रमांक ०८ / २०२३ दि. ११ ऑगस्ट २०२३ केला. आरोपी वाहन चालक जब्बार बेग सत्तार बेग राहणार बुऱ्हानपूर,(मध्यप्रदेश ) सदर दोन्हीं गुन्हे प्रकणावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ ( २ ) ब, ४२,५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाहीत वनक्षेत्रपाल यावल पुर्व विभाग व सर्व सहकारी तसेच् वनक्षेत्रपाल यावल पश्चिम व सर्व सहकारी यांनी सहभाग घेतला. सदर कार्यवाही ही ऋषिकेश रंजन वनसंरक्षक धुळे ,जमीर शेख, उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्प यावल, यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यावल पश्चिम क्षेत्र सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व अजय बावणे वनपाल अतुल तायडे, रवींद्र तायडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला .
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम