सोन्यासह चांदीच्या दरात मोठा बदल ; जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । ११ मार्च २०२३ । देशात सर्वत्र लग्नाचे सिझन सुरु असून गेल्या दोन दिव्साआधीच राज्य सरकारचा अर्थसंकल्प देखील जाहीर झाला आहे. यात अनेक वस्तूच्या किमती कमी तर अधिक देखील झाल्या आहे. त्यातच ग्राहकांची झुंबड लागलेली असते ते म्हणजे सोनं खरेदी करण्यासाठी. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या खरेदीत लक्षणीय वाढ होईल त्यातून लोकं ही सोन्याकडे गुंतवणूकच्या दृष्टीनंही खरेदी करताना दिसत आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सोन्याच्या किंमतीमध्येही लक्षणीय वाढ झालेल्या दिसणार आहे. त्यातून लवकरच हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडव्यालाही सुरूवात होईल. त्यासाठीही अनेकांची लगबग ऐव्हानाच सुरू झाली असेल. सणा-सुदीला आणि लग्नसराईच्या या काळात आता सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला दिसून येते आहे.
तेव्हा चला तर मग जाणून घेऊया आजचे दर काय आहेत?
10 ग्रॅमच्या हिशोबानं 24 कॅरेट सोन्याचे दर हे 56,110 रूपये प्रति 10 ग्रॅमनं वाढले आहेत. तर 22 कॅरेट सोनं हे 51,450 रूपये प्रति 10 ग्रॅमनं वाढले आहेत. तसेच चांदीच्या किमती या 67,300 रूपये प्रति 1 किलोग्रॅमच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सोन्याचे दर हे वाढल्याचे समजते आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे हा विषय सध्या ग्राहकांच्या चिंतेचा विषय झाला आहे. या महिन्यापासून सोन्याच्या किमती या वाढताना दिसत आहेत. सर्वत्र 24 कॅरेटची खरेदी होते त्यामुळे प्रति 10 ग्रॅमच्या दरानं सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
गेल्या 10 दिवसात सोन्याच्या दरात चढउतार-
महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचा दर हा 56,450 रूपये इतका होता. त्यानंतर हाच दर शंभर रूपयांनी वाढत गेला. 7 मार्चला सोन्याचा दर दोनशे रूपयांनी घसरलाही होता. 56,450 रूपयांवरून वाढून तो 56,350 रूपये इतका होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो 300 रूपयांनी वधारला. त्यानंतर सोन्याच्या दरात (Gold Rates in Mumbai) लक्षणीय घट होत काल सोन्याचे दर हे 56,070 वर आहे. अनेक भागांमध्ये यातही वाढ झाली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम