राष्ट्रवादीनंतर कॉंग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल !
दै. बातमीदार । १० जून २०२३ । आगामी होवू घातलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ साठी देशातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून याच दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज सुप्रिया सुळे व पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केल्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या वर्किंक कमिटी म्हणजेच CWC पासून ते अनेक प्रदेशाध्यक्ष बदलाचे संकेत मिळत आहेत.
यादरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांना उत्तर प्रदेश ऐवजी दुसरी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. २०२३ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगना आणि छत्तीसगढ येथे विधानसभेच्या निवडणूका आणि पश्चिम बंगाल येते पंचायत निवडणूका होणार आहेत.
काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणत फेरबदल पाहायला मिळू शकतात अशी चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार तमिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना लवकरच नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत. यासोबतच गुजरात, ओडिसा, पद्दुचेरी, बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडु आणि झारखंड मध्ये पक्ष प्रभारी देखील बदलले जाऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये लवकरच काँग्रेस समिती स्थापन केली जाऊ शकते. राजस्थानमध्ये मु्ख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात वाद सुरू आहेत. यादरम्यान पायलट लवकरच नव्या पक्षाची घोषणा करु शकतात अशी चर्चा सुरू आहे, मात्र काँग्रेसच्या नेत्यांकडून ही शक्यता फेटाळून लावली जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम