लवकरच भाजपमध्ये मोठा भूकंप ; खा.राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही वर्षापासून भाजप व ठाकरे गटात नेहमीच वाक्ययुद्ध सुरु असल्याचे चित्र दिसून येत असतांना आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी भाजपवर हल्लबोल केला आहे.

खा.राऊत म्हणाले कि, भाजपच्या नेतृत्वाखालील सध्याची एनडीए फक्त नावापुरतीच राहिली आहे. त्यामधील घटक पक्ष बाहेर पडत असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्येही मोठा भूकंप होईल, असे भाकीत देखील त्यांनी केले. राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा कारभार, आमदार अपात्र प्रकरण, सनातन धर्म आदी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. देशातील विरोधकांची एकजूट करून बनलेल्या इंडियाच्या पाटणा आणि बंगळुरूमध्ये बैठका झाल्यानंतर भाजपला एनडीएची आठवण झाली. तोपर्यंत त्यांना विसर पडला होता. आता इकडून तिकडून लोक गोळा करून एनडीए दाखवत दिल्लीत बैठक घेतली; परंतु या एनडीएत कोण आहेत, असा सवाल राऊत यांनी केला. शिवसेना आणि अकाली दल नसेल. तर ती एनडीए शून्य आहे. एनडीएची मूळ ताकद शिवसेना आणि अकाली दल होती. आता शिवसेनाच त्यात नाही. उर्वरित लोक येतात आणि जातात. त्यामुळे एनडीए अस्तित्वातच नाही. भाजपच्या नेतृत्वाखाली जी एनडीए आहे, ती नावापुरती राहिल्याचा टोला राऊत यांनी लगावला. आगामी काळात किती लोक एनडीए सोबत राहतील ही शंका असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठी फूट पडेल, असे सूतोवाच राऊत यांनी केले.

सनातन धर्माच्या वादावरून राऊत म्हणाले, सनातन धर्माला विरोध करणारी एमआयएडीएमके सोबत असेपर्यंत पंतप्रधानांनी काही भाष्य केले नाही. मात्र, बाजूला होताच पंतप्रधानांना अचानक सनातन धर्माची काळजी वाटते; परंतु त्यांनी काळजी करू नये. शिवसेना (ठाकरे) सनातन धर्माच्या रक्षणासाठी बसली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडे कोणतेही मुद्दे नाहीत. महागाई, बेरोजगारी, चायनाची घुसखोरी आदी मुद्द्यांना बगल देत भाजप सनातन धर्माचा अजेंडा तयार करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम