काही दिवसात भाजपात मोठा स्फोट ; कॉंग्रेस नेत्याचा दावा !
बातमीदार | ११ सप्टेंबर २०२३ | राज्यातील भाजप पक्षाच्या महिला नेत्या पंकजा मुंडे हे गेल्या काही दिवसापासून शिवशक्ती यात्रेनिमित्त अनेक शहरात भेटी घेत असल्याने त्यांचे जोरदार स्वागत देखील होत आहे. हि यात्रा सुरु असतांना कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी मोठा दावा केल्याने भाजपचा खळबळ माजली आहे.
नाना पटोले रविवारी गोंदियाच्या दौऱ्यावर होते. तिथे स्थानिक पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी भाजपमध्ये मोठी अंतर्गत खदखद असल्याचा दावा केला. या प्रकरणी त्यांनी पंकजा मुंड यांच्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात माझ्याकडे कोणतीही जबाबदारी नाही. मी महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही गोष्टीत नाक खूपसत नाही, अशा नाराजीच्या सूरात पंकजा मुंडे यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. भाजपमध्ये काय सुरू आहे हे मला चांगलेच माहिती नाही. पण येत्या काही दिवसांत भाजपमध्ये मोठा स्फोट होईल हे स्पष्ट आहे.
भाजपमध्ये सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन होऊन दीड वर्ष झाले. त्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे नाना पटोले यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोपाळमधील भाषणाची आठवणही करून दिली. पंतप्रधान मोदींनी भोपाळमध्ये बोलताना राष्ट्रवादीच्या सिंचन व विमान मंत्रालयातील घोटाळ्याचा उल्लेख केला होता. जवळपास 70 हजार कोटींचा हा भ्रष्टाचार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर अवघ्या 8 दिवसांतच राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम