सोन्यासह चांदीच्या दरात आज मोठी घसरण !
दै. बातमीदार । २३ मे २०२३ । तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी जात असाल तर सराफा बाजारात पैसे वाचू शकतात. सोन्याच्या दरात आज चांगलीच घसरण झाली असून चांदीही स्वस्त होत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 169 रुपये किंवा 0.28 टक्क्यांनी स्वस्त होत असून सोन्याचा दर 60210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सोने आज 60203 रुपयांपर्यंत खाली आले होते आणि वरच्या स्तरावर त्याचा रेट 60335 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. या सोन्याच्या किमती त्याच्या जून फ्युचर्ससाठी आहेत. आज चांदीमध्ये अधिक घसरण दिसून येतेय. ती सुमारे 500 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. अशा प्रकारे, आपण चांदी खरेदीवर खूप बचत करू शकता. एमसीएक्सवर चांदी 454 रुपये किंवा 0.62 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. चांदी 72867 रुपये प्रति किलो दराने व्यवहार करतेय.
आज चांदीचा घसरलेला दर बघितला तर तो 72810 रुपये प्रति किलोपर्यंत गेला आणि याशिवाय वरच्या बाजूने 73100 रुपयांची पातळी दिसली. चांदीच्या या किमती त्याच्या जुलै फ्युचर्ससाठी आहेत. आज जागतिक बाजारात सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येतोय. कोमॅक्सवर 6.20 डॉलरच्या घसरणीनंतर सोने आज प्रति औंस 1,975.40 वर व्यवहार करतेय. याशिवाय कोमॅक्सवर चांदी 0.158 डॉलर किंवा 0.66 टक्क्यांच्या घसरणीनंतर 23.902 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम