
देशात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण !
बातमीदार | ९ ऑगस्ट २०२३ गेल्या चार महिन्यांपासून देशासह अनेक राज्यात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली होती. एक किलो टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले होते. दरम्यान, आता टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण होत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचे टोमॅटो १०० ते १२० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत. टोमॅटोची आवक वाढत असल्याने येत्या दोन आठवड्यात दरात आणखी घसरण होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीय.
एपीएमसी मार्कटेमद्ये सध्या मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची आवक होत आहे. यामध्ये सांगली आणि साताऱ्यातून सर्वाधिक टोमॅटो येत आहेत. यात सांगलीतील टोमॅटोला ग्राहकांकडून पंसती मिळत असल्याचंही व्यापाऱ्यांनी म्हटलंय. तर दुसऱ्या बाजूला टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या आहे.होलसेल दरात करायचीय शॉपिंग? मुंबईतील हे 4 मार्केट आहेत बेस्ट पर्यायशेतातले टोमॅटो चोरले, CCTV लाही दिला चकवा, शेतकऱ्यांनी मारला डोक्यावर हातटोमॅटोला सोन्याचे भाव आल्याने चोरही टोमॅटो चोरण्याच्या मागे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत.
टोमॅटोचे दर वाढल्याने चोर चक्क भाजी मार्केट किंवा गोडाऊनमधून टोमॅटो चोरत आहेत. टोमॅटोचे दर गगनाला भिडले असताना चोरट्यांनी आता आपला मोर्चा टोमोटो कडे वळवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावात ही घटना घडली आहे. शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतात टोमॅटोची चोरी झाली. शेतकऱ्यांनी चक्क झाडावरचे टोमॅटोच तोडून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीस गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो चोरट्यानी तोडून नेले आहेत. सीसीटीव्ही असताना देखील अंधार आणि पावसाचा फायदा घेत चोरांनी चकवा दिला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम