कॉंग्रेसची मोठी खेळी ; आ.प्रणिती शिंदेंवर जबाबदारी !

बातमी शेअर करा...

देशात कॉंग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रेनंतर ‘हात से हात जोडो’ यात्रा सुरु होत आहे, त्यापूर्वीच कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं सध्या तयारी सुरू केलीये. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी खेळली आहे. काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षांकडून आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेस पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आलीये.

कर्नाटकातील दावणगिरी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक पदाची जबाबदारी आमदार शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलीये. यंदा कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेत्यांवर कर्नाटकातील लोकसभेच्या जागेवर निरीक्षक म्हणून निवड केलीये. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांची यादीही जाहीर केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम