खजूरच्या दरात मोठी वाढ ; काजू बदामला टाकले मागे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ मार्च २०२३ ।  देशात सर्वात महाग असलेली वस्तू म्हणजे काजू आणि बदाम आहे. पण हेच काजू, बदामपेक्षा जास्त महाग खजुर झाले आहे. त्यामुळे त्याला चांगली मागणी देखील आहे. पवित्र रमजान महिन्यात खजूर हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. रोजा सोडताना खजूर खाऊन तो सोडतात. त्यामुळे खजुराला महत्त्व आहे. खजुरासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. साधारण 1 किलो खजूर 1300 पर्यंत मिळतात. मात्र आता 2600 रुपयांना हे खजूर मिळत आहेत.

अर्थात सगळ्या सरसकट खजुराची किंमत 2600 रुपये नाही. खजुराच्या क्वालिटीवर आहे. मात्र उत्तम दर्जाचा खजूर घेतला तर तो 2600 रुपयांना मिळत आहे. रमजानमुळे खजुरांच्या मागणीत वाढ झाली आहे. ही छायाचित्रे हैदराबादमधील खजुराच्या दुकानातील आहेत.

एका खजूर विक्रेत्याने सांगितले, “मी 22 वर्षांपासून खजूर व्यवसाय करतो. आम्ही अजवा खजूरसह अनेक प्रकारच्या खजूर विकतो. तेलंगणातील एक दुकानदाराने सांगितलं की त्याच्याकडे 120 रुपये प्रति किलो ते 2600 रुपये किलोपर्यंत खजूर आहेत. इराक, इराण, येमेनमधून खजूर आयात केले जातात. , सौदी अरेबिया, ओमान, अल्जेरिया आणि इतर अनेक देशांमधील उत्तम दर्जाचे खजूर असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम