ठाकरेंच्या मागणीला भाजपच्या मोठ्या नेत्याचे समर्थन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिल्याने ठाकरे गट आक्रमक होत शिंदे गटासह निवणूक आयोगावर टीका करण्यात कोणतीही संधी ठाकरे गट सोडत नाही आहे. शिवसेना पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे. प्रत्यक्ष निवडणुका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली होती. त्यांच्या या मागणीला चक्क भारतीय जनता पक्षातून पाठिंबा मिळाला आहे. भाजपच्या मोठ्या नेत्याने ठाकरे यांच्या मागणीचे समर्थन करत ट्विट केलेय. त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केलीय.

आपले पक्ष व चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यांकडून सातत्याने निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहे. आता सोमवारी ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे म्हणाले,की निवडणूक आयोगाने एवढे शपथपत्र, प्रतिज्ञापत्र मागितले. एवढे गठ्ठे दिले. पण त्यानंतर आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही.

मग एवढा खर्च कशाला का करायला लावला.आता निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयोग नेमला पाहिजे. हा निकाल मला मान्य नाही. शिवधनुष्य रावणाला पेललं नाही. ते मिंध्यांना काय कळणार आहे. चिन्हं दिलं तर शिवसेना संपेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे.

 

भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलेय. त्यात म्हटले आहे की, निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण आयोगाचे कामकाज संशयास्पद आहे. भाजप नेते असलेलेल सुब्रमण्यम स्वामी ५ वेळा लोकसभेत खासदार राहिले आहेत. ते १९९० -९१ या काळात केंद्र सरकारमध्ये व्यापार व कायदा व न्याय मंत्री होते.

उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचाही उल्लेख केला होता. ते म्हणाले, ‘ प्रशांत भूषण यांनी एक केस दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या नेमणुकीविरोधात ही केस आहे. त्यात निवडणूक आयोगाच्या नियुक्तीवरुन प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामुळे लोकशाहीचा गाभा धोक्यात येईल, असा इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर सरकारने आक्षेप घेतला होता. त्यांना थेट न्यायाधीश नेमायचे होते. पण न्यायाधीश ठाम राहिल्याने केंद्र सरकार बॅकफूटवर गेले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम