मोठी बातमी : आ.खडसे यांना 137 कोटीची दंडाची नोटीस

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑक्टोबर २०२३

जळगाव  जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिग्गज नेते व  आ. आ.एकनाथराव खडसे पुन्हा अडचणीत आले असून अवैध गौण खनिज उत्खनात त्यांना 137 कोटीची दंडाची रक्कम नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता.

खडसे परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर. जमिनीची खरेदी करण्यात आली होती. याप्रकरणी अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२ १५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या दंडाची नोटीस मुक्ताईनगर बजावली आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे. यापोटी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली देऊ. आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम