मोठी बातमी : आ.आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर
दै. बातमीदार । १५ नोव्हेबर २०२२ मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे दौऱ्यानंतर ठाण्यात आ.आव्हाड यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनयभंग प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाकडून आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणी ठाणे कोर्टाकडून आज मोठा दिलासा मिळाला आहे. 15 हजारांच्या जातमुचकल्यावर आव्हाडांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना माॅल प्रकरणी अटक आणि जामीन मिळाला होता. त्यानंतर कळवा पुलाच्या उद्गघाटन कार्यक्रम आटोपल्यानंतर गर्दी सारून पुढे जाताना महिलेला त्यांनी बाजूला केले होते. या महिलनेने आपला विनयभंग झाला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावला. त्यानंतर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंदही करण्यात आली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम