औरंगाबाद आणी उस्मानाबाद नावाबाबत मोठी बातमी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० ऑगस्ट २०२३ | राज्यातील मागील महाविकास आघाडीच्या सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या नावाची घोषणा भाजप व शिंदे यांच्या सरकारने केली होती. आता त्यावर मोठी अपडेट समोर आली असून या दोन्ही जिल्ह्यांची नावे महसूल क्षेत्र (जिल्हा आणि तालुका पातळीवर) औरंगाबाद आणी उस्मानाबाद हीच नावे राहणार आहेत.

सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे आव्हान देणाऱ्या याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. याचिकांच्या वैधतेवर सरकारने जोरदार आक्षेप नोंदवला होता. महसूल आणी जिल्हा पातळीवरच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढल्या आहेत. जेंव्हा शासन आदेश निघेल त्यावेळी याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. तूर्तास तालुका आणि जिल्हा पातळीवर नवीन नावे वापरणार नाही अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयात हमी दिली आहे. तर शहर पातळीवरील नामांतराला आव्हान देणार्‍या याचिकांवर ४ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम