मोठी बातमी : आरोपी पूनावालाने केला जामीनासाठी अर्ज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ डिसेंबर २०२२ ।  देशाला हादरवून टाकणारी घटना दिल्लीत घडली होती याप्रकरणी आरोपी आफताब पूनावाला याला अटक करून त्याची कसून चौकशी सुरु होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला आहे.
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आफताबने दिल्लीच्या साकेत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, आफताबने नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये आपला गुन्हा कबूल केला आहे.

श्रद्धाच्या खुनाविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं आणि त्याची नार्को तसंच पॉलिग्राफ टेस्ट केली. यामध्ये त्याने खुनाची कबुली दिली आहे. तसंच श्रद्धाचे तुकडे त्याने ज्या ठिकाणी टाकले होते, तिथे काही हाडे सापडली आहेत. ही हाडे श्रद्धाचीच असल्याचं काल फॉरेन्सिकच्या तपासणीत सिद्ध झालं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम