मोठी बातमी : अदानींना मोठा फटका ; 400 कोटींचा करार अडकला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ एप्रिल २०२३ ।  देशात सर्वात जास्त चर्चेत असलेले उद्योगपती गौतम अदानी हेच आहेत. त्यांच्यावर नेहमीच विरोधक टीका करीत असतांना दिसून येत आहे. असे असतांना विमान वाहतूक क्षेत्रात आपले पाय रोवत आहेत. प्रथम 6 विमानतळांचे कामकाज ताब्यात घेण्यासाठी त्यांनी बोली जिंकली, नंतर मुंबई विमानतळ ताब्यात घेतले.

आता देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल व्यवसायात प्रवेश करण्याची योजना आखली आहे. कंपनीने एमआरओ व्यवसायात प्रवेश करण्यासाठी एअर वर्क्सचे अधिग्रहण करण्याची योजना आखली होती, परंतु आता त्यास विलंब होत आहे. एअर वर्क्सच्या अधिग्रहणानंतर अदानी ग्रुपची टाटा ग्रुपसोबत या क्षेत्रात स्पर्धा होऊ शकते. याचे कारण म्हणजे टाटा समूह एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिस लिमिटेड (एईएसएल) खरेदी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.ही एअर इंडियाची उपकंपनी होती, जी खाजगीकरणाच्या वेळी वेगळी झाली होती. आता सरकार ती विकण्याची तयारी करत आहे.

अदानी समूहाने एअर वर्क्स खरेदी करण्यासाठी सामंजस्य करार केला होता. या सामंजस्य कराराची अंतिम मुदत दोनदा निघून गेली आहे. त्याची शेवटची अंतिम मुदत आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी-मार्च होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अदानी ग्रुपची कंपनी असलेल्या अदानी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीजने एअर वर्क्सला 400 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला होता. पण तो पूर्ण न होण्याचे कारण म्हणजे पुंज लॉयड ग्रुप.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम