मोठी बातमी : अनिल देशमुखांना जामीन मंजूर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ डिसेंबर २०२२ ।  राज्याचे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत; मात्र केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात आले असून, माझ्या विरुद्ध तपास यंत्रणेकडे कोणताही ठोस पुरावा नाही, असा दावा केला आहे. तर देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने ठेवला आहे. वैद्यकीय कारणांसह, वाढते वय आणि आजार अशी कारणे देशमुख यांनी जामीन अर्जात दिली होती.

अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. गेल्या 13 महिन्यांपासून ते जेलमध्ये होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय कोर्टाकडून अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. 00 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणार अनिल देशमुख आरोपी आहेत. त्यांना आधी ईडीने अटक केली होती. दरम्यान, ईडी प्रकरणी अनिल देशमुख यांना आधीच जामीन मंजूर करण्यात आला होता. आता सीबीआय प्रकरणातही अनिल देशमुख यांना जामीन मिळला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. ईडीकडून जामीन मिळाल्यानंतरही अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नव्हती. सीबीआय प्रकरणातील गुन्ह्यांमुळे अनिल देशमुख यांनी पुन्हा कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. आता ईडीनंतर अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणातील दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम