मोठी बातमी : पश्चिम बंगालात भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ एप्रिल २०२३ ।  पश्चिम बंगाल येथील पूर्व बर्धमान जिल्ह्यात भाजप नेते राजू झा यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री तब्बल 5 गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून करण्यात आलाय. काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. काही सहकाऱ्यांसोबत कोलकात्याला जात होते दरम्यान, शक्तीगढ परिसरातील एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.

वर्धमानचे एसपी कमनासिस सेन यांनी सांगितले की, कारमध्ये राजू झा यांच्यासह तीन जण प्रवास करत होते. हत्येचं कारण अजून समजू शकला नाही. पुढील तपास सुरू आहे. राजू झा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, राजू झा आपल्या एसयूव्ही गाडीमध्ये दुकानाबाहेर थांबले होते तेव्हा एका कारमध्ये दोन व्यक्ती आले. एका आरोपीने रॉडने कारची काच फोडली, तर दुसऱ्याने गोळीबार सुरू केला. यावेळी गोळीबाराच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. झा यांच्यासोबत उपस्थित असलेले इतर लोकही जखमी झाले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. डाव्या आघाडीच्या राजवटीत झा यांच्यावर सिलपंचालमध्ये अवैध कोळसा व्यवसाय चालवल्याचा आरोप होता. तृणमूल सरकारने त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम