मोठी बातमी : जळगावात इमारत कोसळली ; दोन जणांची सुटका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील मस्जिद जवळ आज मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या एक जुनी इमारत सुमारास कोसळली असून या इमारती खाली एक महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात अनेक जुन्या इमारती असून मनपा प्रशासनाने त्या मालमत्ताधारकांना नोटीस देखील बजावल्या आहेत. मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज नगरात असलेली एक जुनी इमारत ९ वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली राजश्री सुयोग पाठक वय – ५२ ही महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. या घटनेत दोन जणांना सुदेवाने बाहेर काढण्यात यश आले असून एक महिला घरात अडकली असल्याचे समजते. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी धाव घेतली आहे. इमारत जीर्ण झालेली असल्याने त्यात फारसे कुटुंब रहिवास करीत नसल्याने मोठी हानी टळली आहे. जळगाव शहरातील इतर जीर्ण इमारतींच्या बाबतीत मनपा प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पाऊले न उचलल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम