मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० ऑक्टोबर २०२३

राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे तर राज्यातील अनेक जिल्ह्यात समाजाचे जोरदार आंदोलन देखील सुरु आहे. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा आरक्षणासंबंधी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे पत्रकार परिषदेत बोलत आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारने शिंदे समिती नेमली होती. शिंदे समितीने अहवाल सादर केला आहे. हा अहवाल उद्या मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल. समितीने एक कोटी 73 लाख कागदपत्रांची तपासणी केली. त्यात 11 हजार 530 कुणबी नोंदी सापडल्या. या बैठकीत ज्या मराठा समाजबांधवांकडे कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती, समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यातच राज्यभरातून मराठा समाजाचा विरोधही अधिकही तीव्र होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने तातडीने बैठक बोलावून हा निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीत मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या माजी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाची माहिती मांडण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही समिती अत्यंत महत्त्वाची आहे. या समितीच्या अहवालावरच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीलाही अत्यंत महत्त्व होते. वास्तविक राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे या तातडीच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यानुसार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम