मोठी बातमी : दिल्लीत हल्ल्यांचा कट !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ ऑगस्ट २०२३ | दिल्लीतील काही मोक्याच्या ठिकाणी उद्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी राजधानी दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या हालचाली सुरु असल्याचं इंडिया टुडेनं गुप्तचर यंत्रणांमधील सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

पाकिस्तान पुरस्कृत काही दहशतवादी संघटनांकडून तसेच ईशान्येकडील बंडखोर गटांकडूनही या हल्ल्यांचं नियोजन करण्यात येत असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्यांसाठी दिल्लीतील काही महत्वाचे रस्ते, रेल्वे स्थानकं आणि दिल्ली पोलिसांची कार्यालये आणि एनआयएचं मुख्यालय ही ठिकाणं निवडली जाऊ शकतात. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनांकडून हा हल्ल्याचा विचार असल्याचं मीडिया हाऊसनं गुप्तचर यंत्रणांमधील सुत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्ली शहरात दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली असून ठिकठिकाणी वाहनांची पेट्रोलिंग आणि तपासणी केली जात आहे. शहरात सध्या १०,००० पोलिसांची नजर असून १,००० कॅमेऱ्यांच्या मार्फतही देखरेख केली जात आहे. तसेच अँटि ड्रोन सिस्टिम आणि इतर हेरगिरी करणारी यंत्रणा लाल किल्ला परिसरात तैनात आहे. याच किल्ल्यावरुन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी देशाला उद्देशून भाषण करणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम