मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस !
दै. बातमीदार । ११ मे २०२३ । राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांना अनेक ईडीच्या नोटीसा आल्या होत्या. आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आलीय. सोमवारी जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयएल आणि एफएस या कंपनीतील व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती.
त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात निकाल आहे. त्यातच गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम