मोठी बातमी : माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑगस्ट २०२३ | गेल्या दोन वर्षापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना आज शुक्रवारी अखेर जामीन मिळाला असून सर्वोेच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 2 महिन्यांसाठी हा तात्पुरता दिलासा दिला. नवाब मलिक गत फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण हाय कोर्टाने त्यांची याचिका धुडकावून लावली होती. त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या जामिनावर कोणतीही हरकत घेतली नाही. परिणामी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस व न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला.

नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली आहे. त्यांच्यावर कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी आपल्या याचिकेत किडनी प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय जामिन देण्याची विनंती केली होती. कोर्टाने त्यांची विनंती मान्य करत त्यांना 2 महिन्यांसाठी तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला.

नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. बाजारभावानुसार ही जमीन सुमारे 300 कोटींची होती. पण मलिक यांना ती अवघ्या 55 लाख रुपयांत मिळाल्याचा आरोप आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम