मोठी बातमी : आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी मुदतवाढ !
दै. बातमीदार । १४ जून २०२३ । राज्यातील अनेक भागात शिक्षणाचा आजही परिणाम झालेला दिसत नाही तर काहीना घराची परीस्थिती हलाखीची असल्याने शिक्षण घेणे परवडत नसल्याने मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के जागांच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची मुदत सोमवारी संपली. मात्र, अनेक पालकांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी आल्याने या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबवल्या जाणाऱ्या २५ टक्के कोटा प्रवेशातील नियमित प्रवेश फेरीनुसार राज्यातील ६४ हजार २५६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना शाळेतील रिक्त जागांनुसार प्रवेश देण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादीतील २५ हजार ८९० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. यातील आतापर्यंत १० हजार ८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ४९४ विद्यार्थी असून, मुंबई जिल्ह्यात १,७४५, नागपूर २,०१७, नाशिक १.३६८. संभाजीनगर १.३२० : तर ठाणे जिल्ह्यात २,९७५ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीतून प्रवेश मिळाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये या प्रवेशासाठी ज्या मुलांची नावे प्रतीक्षा यादीत येऊनही त्यांच्या प्रवेशाच्या नोंदी पूर्ण झाल्या नव्हत्या, त्यांना न्याय मिळावा, यासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडुन सांगण्यात आले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम