शेतकऱ्यासाठी मोठी बातमी : या दिवशी होणार राज्यात मान्सून दाखल !
दै. बातमीदार । १६ मे २०२३ । राज्यातील बदलत्या हवामानामुळे राज्यात उन्हाळ्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकरी हैराण झाले होते. भारत हा देश कृषीप्रधान असल्याने देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. तर यंदा देखील मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने विलंबाने मान्सून दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असते. २२ मे रोजी दरवर्षी मान्सून देशात दाखल होतो आणि १ जून रोजी केरळमध्ये येतो. परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. चक्रीवादळ आणि बदललेल्या परिस्थितीमुळे २२ मेची तारीख हुकणार आहे.
केरळमध्ये नेमका कधी येणार, याबद्दल निश्चितता नाही. मागच्या वर्षी १ जूनच्या ऐवजी ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. यावर्षी ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होणार होईल तर ७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल, असं स्कायमेटने सांगितलं आहे. तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनची गती धिमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य सल्ला घेऊनच पीकपेऱ्याचं नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम