मोठी बातमी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 3 वर्षांची शिक्षा !

बातमी शेअर करा...

बातमीदार  | ५ ऑगस्ट २०२३ | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान मोठ्या अडचणीत सापडले असून त्याला पोलिसांनी अटक केले असल्याचे समजत आहे. त्यांना तोशाखाना प्रकरण भोवले असल्याचे देखील म्हणण्यात येत आहे. लाहोर पोलिसांनी पीटीआयच्या अध्यक्षांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक केली. इस्लामाबादच्या ट्रायल कोर्टाने त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुढील 5 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. न्यायालयाने माजी पाकिस्तानी पंतप्रधानांना एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

इम्रान यांच्या पक्ष पीटीआयनुसार, खान यांना लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात नेण्यात आले आहे. निकालाच्या वेळी न्यायालयाने म्हटले – तोशाखाना प्रकरणात पीटीआयचे अध्यक्ष इम्रान यांनी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली होती. ते भ्रष्टाचारात गुंतला होता. शनिवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने दुपारी 12.30 पर्यंत निकाल राखून ठेवला होता. त्यानंतरही इम्रान न्यायालयात न पोहोचल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी हा निकाल दिला. आता इम्रान खान ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देऊ शकतात. निकाल येण्यापूर्वी खान यांनी या खटल्याच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. परंतु ट्रायल कोर्टात सुनावणी पूर्ण होण्यापूर्वी दोन्ही कोर्टांनी त्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम