मोठी बातमी : पुढचे काही तास महत्वाचे : चांद्रयान-3 लवकरच…

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ ऑगस्ट २०२३ | चांद्रयान-3 हे ३३ दिवसापूर्वी प्रक्षेपित झाले होते आता चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघे काही किलोमीटर दूर आहे. चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेत पोहोचल्यानंतर आता चांद्रयान-3 दोन स्वतंत्र भागांमध्ये विभागले जाणार आहे. येत्या काही तासांमध्ये प्रॉपल्शन मॉड्यूल विक्रम लँडरपासून वेगळे होईल. तिथून पुढे दोघेही पुढचा प्रवास स्वतंत्रपणे करतील.

इस्रोने बुधवारी सकाळी चांद्रयान-3 चंद्राच्या शेवटच्या कक्षेत इंजेक्ट केलं आहे. आता चांद्रयान-3 चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेत म्हणजेच 153 किमी x 163 किमी अंतरावर आहे. येथून चांद्रयानाच्या लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. त्यातील पहिला टप्पा हा प्रॉपल्शन मॉड्यूल वेगळे करणे असेल. यानंतर, चांद्रयानाचा वेग आणि दिशा बदलली जाईल आणि हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ आणण्याची प्रक्रिया सुरू होईल. चांद्रयान-3 हे तीन प्रमुख भागांनी बनलेले आहे, पहिला भाग प्रॉपल्शन मॉड्यूल, दुसरा लँडर विक्रम आणि तिसरा प्रज्ञान रोव्हर आहे. सध्या हे तीन भाग चंद्राच्या कक्षेत एकत्र आहेत. आज (17 ऑगस्ट) प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होतील. यानंतर, प्रॉपल्शन मॉड्यूल चंद्राच्या अंतिम कक्षेत फिरत राहील, तर चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडरचे अंतर कमी होईल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडरचे पहिले डी-ऑर्बिटिंग 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. म्हणजेच प्रथमच त्याचे चंद्रापासूनचे अंतर कमी होणार आहे. यानंतर, 20 ऑगस्ट रोजी पुन्हा सव्वा दोन वाजता डी-ऑर्बिट केले जाईल. 23 ऑगस्ट रोजी ते चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम