मोठी बातमी : कुविख्यात गँगस्टर अतीक अहमदसह भावाची गोळी झाडून हत्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ । गेल्या तीन दशकापासून उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी माजविणारे कुविख्यात गँगस्टर अतीक अहमदसह त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची तीन अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही धक्कादायक घटना प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री घडली. दोघा आरोपींना पोलीस बंदोबस्तात कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. युपी पोलिसांनी यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे हत्या घडली तेव्हा अतीक हा मिडीयाशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतानाच हल्लेखोरांनी त्याच्यासह अश्रफच्या डोक्यात गोळी झाडली. हल्लेखोरांनी हत्येनंतर जय श्रीरामचे नारे दिले. दरम्यान, पोलीस सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत 17 कर्मचाऱ्यांचे रात्री निलंबन करण्यात आले.

अतीकचा मुलगा असदसह त्याच्या साथीदार गुलामचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता व शनिवारी सकाळी 10 वाजताच असदवर अंत्यसंस्कार करण्यात आले असतानाच आता त्याच्या वडिलांसह भावाचीही हत्या झाल्याने प्रयागराज हादरले आहे. असदच्या अंत्यसंस्कारासाठी पोलिसांनी असदच्या आजोबांसह मोजक्या 20-25 नातेवाईकांनाच कब्रस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली होती. अतीक मुलाच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊ शकला नव्हता. सुपूर्द-ए-खाकदरम्यान कब्रस्तान परीसराची ड्रोनद्वारे निगराणी करण्यात आली होती. पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्थाही यावेळी ठेवण्यात आली होती.

दरम्यान, या असद प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा न्यायदंडाधिकारी अंकुर श्रीवास्तव यांना तपास अधिकारी बनवण्यात आले आहे. आदेशात म्हटले आहे की, कुणीही व्यक्ती एन्काऊंटरविषयीचे पुरावे 3 दिवसांत देऊ शकतो. असदच्या नातेवाईकांनी यापूर्वीच अतीकची एन्काउंटर करून हत्या होणार असल्याची भीती वर्तवली होती मात्र आता तसे घडले नाही. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आल्यानंतर हल्लेखोरांनी अचानक येत गोळ्या झाडल्याने अतीकसह त्याच्या भाऊ अश्रफ अहमदचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, हल्लेखोर तीन होते व त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नवीन तिवारी, अरुण मोरया व सोनू अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुंड अतीक अहमद हा २००५ मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता. तसेच अतीक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. दुचाकीवरून तीन संशयित पत्रकारांच्या वेशात आले व त्यांनी प्रतीक अहमद मीडियाला बाईट देत असताना त्याच्यासह भाऊ अश्रफ अहमदच्या डोक्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान हत्यानंतर आरोपींनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तसेच सरेंडर सरेंडर म्हणत पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम