मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांनी आपल्या मागण्या बदलविल्या ; वाचा काय म्हणाले ते !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑक्टोबर २०२३

मराठा आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यात मोठे आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर आता त्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात सभा घेत सरकारला धारेवर धरीत असतांना नुकतीच त्यांची सभा पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये सभा पार पडली. या सभेला हजारो समाज बांधव उपस्थित होते.

या सभेतूनच जरांगे पाटील यांनी सरकारला स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. अंतरवलीतील सभेएवढी मोठी सभा आहे. हे पुणेरी मराठे आहेत. यांच्या नादी लागू नका. आपण बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. असं जरांगे पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण द्या. स्वतंत्र प्रवर्गाला ५० टक्क्यांत बसवा. ज्यात मराठ्यांचं हित नाही तो जीआर आम्हाला मान्य नाही. सरकारने दिलेल्या जीआरमध्ये वंशावळ हा शब्द टाकण्यात आला होता तो जीआर मराठ्यांच्या हिताचा नव्हता. मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका. आता सुट्टी नाही. आरक्षण घ्यायचंच. नेमकं काय करायचं ते २२ ऑक्टो. ला सांगणार.” असं जरांगे पाटील म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम