मोठी बातमी : कारगिलमध्ये मध्यरात्री उशिरा ढगफुटी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जुलै २०२३ ।  देशातील दिल्ली त्यानंतर महाराष्ट्रात पावसाचा मोठा कहर सुरु असतांना आता दुसरीकडे उत्तरकाशी आणि कारगिलमध्ये रात्री उशिरा ढगफुटी झाली. यमुनोत्री महामार्गावर दरड कोसळली. अनेक वाहने गाडली गेली. शाळांमध्येही मलबा साचला आहे. मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. हवामान खात्याने येत्या २४ तासांत डेहराडून, उत्तरकाशी, टिहरी, पौरी आणि नैनितालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे राजस्थानच्या जोधपूर आणि बिकानेरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. जोधपूरमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दुचाकी, स्कूटी आणि स्वार रस्त्यावर वाहून गेले. 2 तासात 66.8 मिमी पाऊस झाला. दुसरीकडे, महाराष्ट्रातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडच्या इरशाळगडमध्ये दरड कोसळून मृतांची संख्या 22 वर गेली आहे. दिल्लीत पुन्हा एकदा यमुनेच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. हिमाचलमध्ये 22 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ओडिशातील १५ जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम