मोठी बातमी ! – नेते एकनाथ खडसे भाजपाच्या वाटेवर? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ३ एप्रिल २०२४ । तीस वर्षांहून अधिक काळ भाजपात राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले नेते एकनाथ खडसे आता पुन्हा भारतीय जनता पार्टीत परतणार असल्याचे सामोरे आले आहे. एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाता असून पक्ष सोडण्याचा संपूर्ण ठपका देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवून त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, आता ते पुन्हा भारतीय जनता पार्टीत सामिल होण्याच्या चर्चांना जोरदार वेग आला आहे.

भारतीय जनता पक्षाशी ३० हून अधिक वर्षे एकनिष्ठ राहिल्यानंतर नेते एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, २०२० मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आले. तेव्हापासूनच त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली. बुथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली. त्यामुळे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम