मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात विषबाधा ; घाटी रुग्णालयात दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जानेवारी २०२३ राज्यातील एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात ६०० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हि घटना औरंगाबाद येथे घडली असून रुग्णांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात पाहुण्यांना जेवणानंतर काही वेळातच उलट्या व मळमळीचा त्रास झाल्याने त्यांना परिसरातील एमजीएम व घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तविण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह बुधवार, 4 जानेवारी रोजी पार पडला. विवाह पार पडल्यानंतर रात्री पाहुण्यासाठी मेजवानी देण्यात आली होती. जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले.हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळी चा त्रास जाणवू लागला. काही पाहुणे स्वतःहून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र याचे प्रमाण वाढताच हे मेजवानतील जेवणातून झाल्याचे समोर आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम