मोठी बातमी : प्रेम बघून भारावलो ; शरद पवारांचा राजीनामा मागे !
दै. बातमीदार । ५ मे २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर केली.
आपण निवृत्तीचा निर्णय मागे घेतल असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंलं आहे. मागील तीन दिवसांपासून देशभरातील कार्यकर्ते आणि पक्षांनी मला निर्णय मागे घेण्यासंदर्भात विनंती केली होती. कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याचं पवारांनी जाहीर केलं.
निवड समितीने बैठकीमध्ये दोन प्रस्ताव ठेवले होते. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समस्य समिती देणार आहे. पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार आहे. दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात आलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम