मोठी बातमी : पवारांचा राजीनामा नामंजूर !
दै. बातमीदार । ५ मे २०२३ । राज्यातील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणून भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आज पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत शरद पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी स्थापन केलेली समितीने त्यांना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रभर कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने शरद पवार यांच्या राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव आज मांडला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी पुन्हा अध्यक्ष व्हावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. एक राजीनामा नामंजूर करण्याचा, तर शरद पवार पून्हा अध्यक्ष व्हावे, असा दुसरा प्रस्ताव मांडण्यात आला. निवड समितीने एकमताने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. आता शरद पवार काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार समितीची शिफारस मान्य करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत. समितीची शिफारस शरद पवार यांना कळवण्यात येणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम