मोठी बातमी : राष्ट्रपती मुर्मू यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जून २०२३ ।  देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकतेच सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. यावेळी सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी सोमवारी त्यांना ‘द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार’ पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू पहिल्या भारतीय महिला आहेत.मला खूप सन्मान वाटत आहे. हे केवळ माझ्यासाठीच नाही तर भारतातील 140 कोटी लोकांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. अशी भावना मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात संतोखी यांची भेट घेतली. दोघांमध्ये शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांदरम्यान 4 सामंजस्य करार करण्यात आले. हे सामंजस्य करार आरोग्य, कृषी आणि क्षमता निर्माण क्षेत्रात करण्यात आले आहेत.

 

 

भारताप्रमाणेच सुरीनाममध्येही अनेक जाती, धर्म आणि भाषांचे लोक राहतात. भारत आणि सुरीनाममधील मैत्री ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर आधारित आहे. मात्र, दोन्ही देशांमधील व्यापार क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी सहकार्य वाढवण्याची गरज आहे. संरक्षण, आयुर्वेद आणि फार्मा क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवता येईल. भारत सुरीनामच्या मानवी संसाधनांमध्ये तांत्रिक सहकार्य आणि कौशल्य विकास वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. जलद प्रभाव प्रकल्पांना चालना देऊन सुरीनामच्या सामाजिक-आर्थिक विकासात भागीदारी करण्यास भारत तयार आहे. भारत-UNDP निधी अंतर्गत सुरीनामने विकसित केलेल्या ‘अर्ली फ्लड वॉर्निंग सिस्टीम’ला मंजुरी मिळाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम