मोठी बातमी : समृद्धी महामार्ग राहणार चार तास बंद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ नोव्हेबर २०२३

राज्यात नेहमीच अपघाताच्या मालिकेने चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतूक दोन दिवस बंद असणार आहे. पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान, दोन्ही बाजूंची वाहतूक आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी असे दोन दिवस दुपारी १२ ते ४ यावेळात बंद असेल.

उर्वरित कालावधित वाहतूक सुरळीत सुरू असणार आहे. बंद कालावधित पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. आज आणि उद्या दुपारी १२ ते ४ या वेळेत जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.

जालना इंटरचेंज १४ ते सावंगी इंटरचेंज १६ दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक निधोना (जालना) इंटरचेंज १४ मधून बाहेरपडून निघोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग ७५३ अ (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंद्रीज शाळेपर्यंत असेल. नंतर वाहणे उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज १६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे रवाना केली जातील. समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतुकीत देखील बदल असणार आहे. सावंगी इंटरचेंज १६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडूनवर नमूद केलेल्या मार्गावरून (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज १४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे रवाना होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम