मोठी बातमी : शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका ; मी शर्यतीत नव्हे !
दै. बातमीदार । ८ जून २०२३ । सध्या देशातील सर्वच विरोधक एकत्रित येवून भाजपला सत्तेपासून पाय उतार कसे करता येईल यासाठी मोठा आटापिटा करीत असतांना दिसून येत असतांना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते शरद पवार यांनी आपली भूमिका सांगितल्याने देशाच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे.
निवडणूकच लढवत नसल्याने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असण्याचा प्रश्न नाही. आधी एकत्र येणे गरजेचे आहे. नेता कोण व पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हे नंतर पाहता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कट्टर भाजप विरोधी आहे. पाटणा येथील विरोधी पक्षांच्या एकजुटीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. कालच यासंदर्भात नितीशकुमार यांचा मला फोन आला होता, असे सांगत पवार यांनी नमूद केले की, नितीशकुमार यांच्यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे. ते आमच्याबरोबर आहेत. नितीन गडकरी हे चांगले मंत्री असून ते मंत्रिपदाला न्याय देतात. ते पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाहीत, असे सांगत पवार यांनी गडकरींचे कौतुक केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम