मोठी बातमी : सोनिया गांधीनी लिहली मोदींना पत्र !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ सप्टेंबर २०२३ | संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे अधिवेशन चालणार आहे. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन असणार आहे. राज्यसभेनेही खासदारांना सूचित केलं आहे की १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे तेव्हा सर्व खासदारांनी त्यासाठी उपस्थित रहावं. सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत हे कामकाज चालेल त्यानंतर दुपारी २ ते ६ या वेळात पुढचं कामकाज चालेल असंही नमूद करण्यात आलं आहे. या अधिवेशनाचा अजेंडा काय? हे अद्याप समोर आलेलं नाही. संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

यात म्हटले आहे कि, पहिल्यांदा विरोधी पक्षांना अधिवेशनाचा विषय, अजेंडा काहीही सांगण्यात आलेलं नाही. देशाच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर ‘इंडिया’मधले पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात. मात्र या विशेष अधिवेशनाचं कारण काय आहे त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.

या विशेष अधिवेशनाच्या आधी ९ आणि १० सप्टेंबरला जी २० शिखर परिषद पार पडते आहे. मोदी सरकारने त्यांच्या नऊ वर्षांच्या कार्य काळात मोदी सरकारने एकदाही अधिवेशन बोलवलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अधिवेशन नव्या संसदेत घेतलं जाणार आहे. अर्थसंकल्पयी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे अधिवेशनाचे तीन प्रकार आहे. विशेष अधिवेशन तेव्हाच बोलावलं जातं जेव्हा एखादी विशेष घटना असते. आता यावेळी सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं अधिवेशन कोणत्या विषयावर चर्चा केली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम