मोठी बातमी : मध्यरात्री दरड कोसळून गाव अडकले संकटात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जुलै २०२३ । देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना राज्यात देखील काही भागात पावसाचा कहर सुरु झाला. यामुळे राज्यातील अनेक गावांना याचा मोठा फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 30 कुटुंब मलब्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. एनडीआरएफच्या 2 पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे.बचावकार्यात सहभागी होण्यासाठी मुंबईहून आणखी 2 टीम रवाना झाल्या आहेत. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे.

रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 22 जणांची सुटका करण्यात आली आहे. यामधील 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे 100 हून अधिक अधिकारी बचाव कार्यात गुंतले आहेत. आम्हाला एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत आहे, असे रायगड पोलिसांनी म्हटले आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. मुसळधार पाऊस आणि दुर्गम भाग असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. बचावकार्य सुरू असताना एका एनडीआरएफ जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. मंत्री उदय सामंत, दादा भुसे हे घटनास्थळी गेले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम