मोठी बातमी : उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ ऑक्टोबर २०२३

गेल्या काही वर्षापासून देशभरातील अनेक राजकीय नेते यांच्यासह प्रसिद्ध उद्योजकांना जीवे मारण्याच्या धमकी येत आहे तर नुकतेच उद्योगपती मुकेश अंबानी यांना देखील जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने अंबानी यांना ईमेल पाठवून 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांकडून तो त्यांना मारून टाकेल, असे सांगितले. दि.२७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अंबानींना ही धमकी मिळाली.

‘तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत’, हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे, गामदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) 29 सप्टेंबर रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. MHA ने त्याला Z+ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. सुरक्षेचा खर्च मुकेश अंबानी करतात. हा खर्च दरमहा 40 ते 45 लाख रुपये आहे. यापूर्वी त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा मिळाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गृह मंत्रालयाने हा निर्णय आयबीच्या शिफारसीवरून घेतला आहे. आयबीने मुकेश अंबानींना धोका होण्याची भीती व्यक्त केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम