मोठी बातमी : उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ डिसेंबर २०२२ । उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) अनेक चर्चांना उधाण आलंय.

राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray) माजी मुख्यमंत्र्यांच्या ( Former Chief Minister) भेटीला निघाले आहेत. उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीबाबत अनेक चर्चांना उधाण आलंय. (shiv sena ubt uddhav thackeray meets former cm and senior leader manohar joshi at mumbai maharashtra politics)

मनोहर जोशी (Manohor Joshi ) यांचा शुक्रवारी २ डिसेंबरला वाढदिवस होता. मनोहर जोशी यांनी वाढदिवसानिमित्त मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. मी आधीपासूनच सेनेत आहे, अंस मनोहर जोशी म्हणाले होते. मनोहर जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता उद्धव ठाकरे भेटीला गेले आहेत.

भेटीचं नेमकं कारण काय?

उद्धव ठाकरे हे जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणयासाठी भेटीला निघालेत. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार आहेत. मात्र या भेटीत विविध राजकीय चर्चा होणार असल्याचं सामोरे येत आहे. आगामी महापालिकेच्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्त्वाची समजली जात आहे.

डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. अनेक दिग्ग्जांनी ठाकरेंची साथ सोडली. अवघ्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तीकरांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न असल्याची चर्चा यानिमित्तानं रंगतेय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम