मोठी बातमी : वंचित बहूजन आघाडीची एका अटीवर होणार शिंदे गटासोबत युती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जानेवारी २०२३ । राज्याच्या राजकारण कोणता पक्ष कुणासोबत युती करतो हे अद्याप पक्के झालेले नाही पण ठाकरे गटासोबत युतीची घोषणा करणारे वंचित बहूजन आघाडीचे नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची नुकतीच भेट घेतल्यानंतर मोठा गोप्यस्फोट केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, शिंदे गटाने भाजपची साथ सोडल्यास त्यांच्यासोबत युती करायला आम्ही तयार आहोत, तसेच, सध्या आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. काल प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली येथे भेट झाली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि शिंदे गट व भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आज पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी काल दिल्लीत असताना मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून फोन आला होता. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी मी संध्याकाळी भेट घेतली. भेटीत विविध मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांच्याशी अडीच तास चर्चा केली. शिंदे गट व भाजपसोबत युती करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातील पुढील निवडणुका आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत लढवणार आहोत. या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. भाजपसोबत आम्ही कधीही जाणार नाही. तसेच, ज्या पक्षांबरोबर भाजप आहे, त्या पक्षांसोबतही आम्ही जाऊ शकत नाही.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासोबत आमचे वैचारिक भांडण आहे. जी व्यवस्था आम्ही उद्धवस्त केली, ज्या व्यवस्थेत बदल घडवून आणला तीच व्यवस्था भाजप आणि आरएसएस पुन्हा आणू इच्छित आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करणे आमच्या नैतिकतेत बसत नाही. विरोधकाचा विरोधक आपला मित्र, अशी भूमिका याबाबतीत आम्ही कधीही घेणार नाही. विचारधारेशी तडजोड होऊ शकत नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम