ठाकरे गटाने केला शिंदे व भाजपचा सुपडा साफ 

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ । राज्यात जरी शिंदे गटाच्या भाषणातून नेहमी सांगत आले की, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे आम्ही आहोत परतू नुकत्याच झालेल्या राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायती निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम आहे. गुहागर तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाचा सुपडा साफ झाला आहे.  गुहागरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा मतदार संघातला प्रभाव कायम आहे.

18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरू असून  निकालाचा पहिला कल हातात आला आहे.  गुहाघरमध्ये भाजपच्या ताब्यातील दोन्ही ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. अंजनवेल आणि वेलदूर मध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहे.  दिव्या सुमित वनकार वेलदुर सरपंच,तर सोनल रामनाथ मोरे अंजनवेल सरपंच म्हणून निवडून आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील निकाल

एकूण ग्रामपंचायत-51, मतदान झालेल्या  ग्रामपंचायती- 36, बिनविरोध ग्रामपंचायती-15, निकाल खालील प्रमाणे (बिनविरोध पकडून) शिवसेना ठाकरे – 11, शिंदे गट – 04, भाजप- 00, राष्ट्रवादी- 01, काँग्रेस- 00, इतर- 06

नागपूरमध्ये  कुही तालुक्यातील नवेगाव ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस समर्थित विद्या चापले विजय झाल्या आहेत. भिवापूर फेगड ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थित आशिष पाल विजयी झाले आहे.  तर तुडका ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थित धनराज सहारे विजयी झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम