ठाकरे गटाचा मोठा प्लान : खा.राणांच्या विरोधात हि वाघीण उतरणार मैदानात !
दै. बातमीदार । १७ मे २०२३ । राज्यात ठाकरे गटाच्या विरोधात शिंदेंची शिवसेना व भाजप चांगली कामाला लागली आहे. पण ठाकरे गट देखील आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती.
या बैठकीत प्रामुख्याने 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर आपला उमेदवार निवडून आणण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधान परिषदेवरील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विरुद्ध एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. तर सुषमा अंधारेंना अमरावतीतून रिंगणात उतरवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न असणार आहे. शिवसेनेने 2019 मध्ये जिंकलेल्या 18 लोकसभा मतदारसंघांसोबतच, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गट आक्रमकपणे निवडणूक लढणार आहे. छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार MIM चे इम्तियाज जलिल आहेत. तर अमरावती लोकसभा मतदार संघात अपक्ष खासदार नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम