विद्यार्थ्यांना मोठा दिलासा : सरकारने मान्य केल्या मागण्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मार्च २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसांपासून MPSCच्या विद्यार्थीनी आपल्या विविध मागण्या सरकारपुढे ठेवल्या होत्या. त्यांच्या मागण्या सरकारने मान्यही केल्या आहेत. आता या विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. EWS प्रमाणपत्राची अट आता शिथिल झाली आहे.

BJP add

कोरोना काळामुळे EWS प्रमाणपत्र न निघाल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. याबद्दल विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. EWS प्रमाणपत्र नसेल तरीही विद्यार्थ्यांना मुलाखतींसाठी संधी देण्याची मुभा आता देण्यात आली आहे. याबद्दलचा शासननिर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या निर्णयासाठी स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. यापूर्वी MPSC च्या विद्यार्थ्यांनी दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिका पॅटर्न २०२३ पासून लागू करण्याला विरोध केला होता. हा पेपर पॅटर्न २०२५ पासून लागू व्हावा, अशा मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलनही केलं होतं. अखेर या आंदोलनाला यश आलं आणि विद्यार्थ्यांची ही मागणीही मान्य झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम