मोठा दिलासा : खाद्य तेलाचे भाव शंभराच्या आत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मे २०२३ ।  देशात पेट्रोल-डीझेल महाग होत असतांना सध्या देशातील जनतेला खाद्यतेलापासून मोठा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. मागील १००० दिवसांपासून खाद्य तेलाचे भाव सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला तेल तसे महाग पडत होते. अर्थातच त्याला अनेक कारणे होती. मात्र आता सोयाबीन तेलाचा भाव शंभर रुपयांच्या आत आल्याने, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात गृहिणींना लोणचे तयार करण्याचे वेध लागतात. त्यासाठी मसाल्यासोबतच महत्त्वाचा घटक म्हणजे तेल आहे. मात्र तेलाच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्यामुळे, तेल शंभरीपार झाले होते. सुमारे १००० दिवसानंतर आता तेलाचे भाव शंभर रुपयांच्या आत आल्याने दिलासादायक वातावरण तयार झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम